शहरातील स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाल्याने व दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती, हि बाब लक्षात घेऊन वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत उमरगा शहरातील स्मशानभूमीचे नुतनीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून आज मा.खा.प्रा.रविंद्रजी गायकवाड सर यांच्या हस्ते आज या स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
या स्मशानभूमीमध्ये अंतर्गत पेव्हर ब्लॉक, 2 क्रिमिशल शेड, 1 प्रतीक्षा गृह, वाचमन निवासस्थान, दिवाबत्ती, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, सर्व बाजूंनी तारेचे कुंपण चेन लिंक फेन सिंग विथ गेट, व नदीच्या बाजूने पायऱ्या व दगडी पिचिंग, आदी कामे करण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर उमरगा शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
उमरगा शहरातील स्मशानभूमी भव्य असे नूतनीकरण करून एक अल्हाददायक वैकुंठ धाम व्हावे असे खूप दिवसापासूनचे स्वप्न होते. आज या कामाच्या भूमीपूजनाने या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत असल्याने खूप खूप समाधान झाले. येत्या पुढील काळात उमरगा शहरातील सगळ्या स्मशानभूमी चे नुतनीकरण करणार तसेच या 5 वर्षांत ज्या-ज्या गावात स्मशानभूमीची समस्या असेल, मग ती कोणत्या ही समाजाची असो ती समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे.
#ShivSena #कार्यशिवसेनेचे #Umarga #Lohara







