राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उमरगा लोहारा तालुक्याचा दौरा केला. यावेळी साहेबांना तालुक्यातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
सदर दौऱ्यात त्यांनी माकणी, सास्तुर चौक, राजेगाव, कवठा या गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. संकट मोठे आहे शेतकऱ्यांनी खचून न जाता या संकटावर मात करावी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, असे असले तरी नुकसान मोठे असल्याने केंद्र शासनाच्याही मदतिची गरज असून यासाठी पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वस्त केले.
सदर दौऱ्यात राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार राहुल मोटे, युवा नेते किरण गायकवाड, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Umarga #Lohara #उमरगा #लोहारा







