मांगल्याचे प्रतिक असणारा हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो.
अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावलीसाठी उमरगा शहर बाजारपेठ विविध आकारातील आकाश कंदीलांनी सजली आहे. मोठ्या आकाश कंदीलांबरोबरच छोट्या आकारातील आकाश कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे.
मांगल्याचे प्रतिक असणारा हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो. दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदीलांची मागणी वाढते.पारंपरिक आकार आणि प्रकारांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन प्रकार आकाश कंदीलात पहावयास मिळतात.









