#सावित्री_जिजाऊ_जयंतीनिमीत्त…,
#मुरुम_प्रीमियर_लीगचा_समारोप_सोहळा…!!
सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मुरूम शहरात मुरुम प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील युवा खेळाडूंना चांगली संधी मिळावी यासाठी भरवण्यात आलेल्या व महिनाभर चालेल्या मुरुम प्रीमियर क्रिकेट लीगचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळवून समारोप करण्यात आला. यावेळी विजेत्या प्रिन्स C संघाला सुप्रसिद्ध व्याख्याते ॲड. शितल चव्हाण यांनी ११०००/- रुपये व महानायीका चषक व उपविजेत्या प्रिन्स A संघाला मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव भास्कर वैराळे व तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने यांनी ७०००/- रुपये व महानायीका चषक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याबरोबरच व्ययक्तीक उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींकडून पारितोषिके देण्यात आली. या क्रिकेट प्रिमीयर लीगसाठी शहरातील अनेक तरुणांनी सहकार्य केले, त्यांचेही मनस्वी आभार…!!
#जय_साऊ_जय_जिजाऊ…!!
– मा. मोहन जाधव (निमंत्रक)
मुरुम प्रीमियर क्रिकेट लीग.








