उपजिल्हा रुग्णालयातील हे मोड्युलर शस्त्रक्रियागृह आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुले झाले आहे.
सदर शस्त्रक्रियागृह संपूर्णतः वातानुकूलित असून त्यामध्ये येणारी हवा शुद्ध करूनच मशीनद्वारे पुरवठा केली जाते. तसेच वेळोवेळी प्रतिजैविकेची फवारणी सुद्धा अत्याधुनिक मशीनद्वारे शस्त्रक्रियागृहात केली जाते. या मोड्युलर ओ.टी. चे वैशिष्ट्य असे आहे कि, शस्त्रक्रियागृहातील आर्द्रता व तापमान सुद्धा स्वयंसंचलित यंत्राद्वारे नोंद ठेवण्यात येत असून ऑक्सिजन पुरवठा सुद्धा मशीनद्वारे अविरत पुरविला जातो.
तसेच याठिकाणी अत्याधुनिक बॉईल्स मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारे रुग्णास शस्त्रक्रियेदरम्यान भूल देण्यात येते. शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरात येणारे ऑपरेशन टेबल रिमोटद्वारे नियंत्रित करता येते.
या अत्यंत अत्याधुनिक मॉड्युलर शस्त्रक्रियागृहामुळे उपजिल्हा रुग्णालयात विवीध आजारावरील लघु व मोठ्या शस्त्रक्रिया सहज व सोप्या पद्धतीने करण्यासाठी मदत होणार आहे. तालुक्यातील जास्तीत गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक बडे, डॉ.विक्रम आळंगेकर, रुग्णालयातील विशेषतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, वर्ग – ४ कर्मचारी, व इतर कर्मचारी उपस्थित होते.






