दंगलीच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद जिल्हयात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागु दिनांक १६/११/२०२१ ते दिनांक २३/११/२०२१ पर्यंत

विषय- अमरावतीनांदेडमालेगांवपुसद व कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या
पार्श्वभुमीवर उस्मानाबाद जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४
अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागु 

आदेश

ज्याअर्थीपोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांचेकडील वाचा क्रं.१
नुसार विनंती केलेनुसार त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रझा
अकादमीने १२ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटुन
महाराष्ट्रात अमरावती
नांदेडमालेगावपुसद व कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झालेला आहे. या घटनेचा फायदा घेवुन
उस्मानाबाद जिल्हयामध्ये काही समाजकंटक इंस्टाग्राम
व्हॉटसअपटवीटरफेसबुक इत्यादी समाज माध्यमाव्दारे दोन
समाजामध्ये
गटामध्ये तेढ निर्माण
करण्याची शक्यता निर्माण झाल्याने उपाय योजना म्हणुन
 CRPC-१४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू
करण्याबाबत कळविले आहे.
 

आणि ज्याअर्थीत्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने
उस्मानाबाद जिल्हयातील क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने खबरदारी घेणेसाठी
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढणे आवश्यक
झाले असल्याची माझी खात्री झालेली आहे.
 

त्याअर्थीमी कौस्तुभ दिवेगावकरजिल्हादंडाधिकारी उस्मानाबादफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान
करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन वरील घटनेच्या अनुषंगाने कायदा
 व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातुन उस्मानाबाद
जिल्हयात भागात
 दिनांक १६/११/२०२१ चे ००.०१ ते दिनांक २३/११/२०२१ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया
संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात
 येत आहे.

 

१. कोणीही व्यक्ती इंस्टाग्रामव्हॉटसअपटवीटरफेसबुक इत्यादी समाज माध्यमाव्दारे जातीय
तणाव निर्माण करणा-या
 गोष्टी पसरविणे.

 २. कोणीही व्यक्ती इंस्टाग्रामकॉटसअपटवीटरफेसबुक इत्यादी समाज माध्यमाव्दारे
आक्षेपार्ह पोस्ट टाकणे/शेअर
 करणेअशा कृत्य केल्यास त्याची सर्वस्वी
जबाबदारी ग्रुप अॅडमिनची राहील.

३. समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती/अफवा
जाणीवपूर्वक प्रसारीत करणे.

 ४. पाच व पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र
येणे
सभा घेणे तसेच शस्त्र
लाठी
काठी बाळगणे,

 ५. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण
करणा-या मजकुराचे फलेक्स बोर्ड लावणे व त्या प्रकारच्या घोषणा देणे. सदर आदेशाचे
उल्लंघण केल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस
पात्र
 राहतील.

 






Join WhatsApp

Join Now