संघर्षशिल युवानेतृत्व !! किरण रवींद्र गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 !! संघर्षशिल युवानेतृत्व !!

किरण रवींद्र गायकवाड 

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या रवी सरांनी आपल्या वक्तृत्वाच्या आणि कर्तुत्वा जोरावर सामाजिक बांधिलकी जपत राजकारणात आपला ठसा उमटविले.आणि दोन वेळा आमदार एक वेळ खासदार तसेंच आरक्षण सुटताच ज्ञानराज चौगुले या साधारण शिवसैनिकास सलग तीन वेळा आमदार करण्याची किमया ज्यांनी केली अशा प्रा.रवींद्र विश्वानाथराव गायकवाड यांचे सुपुत्र किरण रवींद्र गायकवाड.तसेंच कृष्ण खोरे महामंडळाचे माजी सचिव व्यंकटरावजी गायकवाड यांचे पुतणे असताना देखील कोणताच बढेजाव न मिरवीता सामान्य जनतेत राहूनच आज कार्य करताना किरण गायकवाड हे आपणाला दिसतात.कुणाच्या दुकानाचे उदघाटन असो,कुणाचे वाढदिवस असों, कुणी मयत झाला आहे असे समजताच अंत्यविधीसाठी हजर राहणं, ग्रामीण भागात लहान मोठ्या प्रत्येक स्पर्धेला उपस्थित राहून युवकांना प्रोत्साहित करणारे किरण गायकवाड मनाला भावुन जातात.

Kiran Gaikwad Helloomerga

गेल्या दोनवर्षांपासून कोरोना या जागतिक महामारीने जगणं मुश्किल करून दिले असताना सर्वसामान्य व्यक्तीना अनेक प्रकारच्या संकटाना सामोरे जावं लागत होतं.परंतु सामाजिक बांधिलकी जपत किरण गायकवाड यांनी पायाला भिंगरी बांधुन मतदार संघातील अडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.खरं पाहता त्यांना बाहेर पडण्याची काहीच गरज नव्हती परंतु त्यांच्यातील माणुसकी त्यांना गप्प बसू दिली नाही आणि उमरगा लोहारा तालुक्यातील 20 गावात कोरोना दक्षता कक्षाची स्थापना करून लोकांना धैर्य देण्याचे कार्य किरण रवींद्र गायकवाड यांनी केले.या संघर्षशील युवानेतृत्वाचे वर्णन कितीही केलो तरी अपूर्णच आहे कारण सूर्याची जशी किरणं अबाधित आहेत तसेंच हा रवी ( सरांचा ) किरण आहे कितीही संकट आणि संघर्ष आली त्यांच्या छाताडावर पाय देवून उभा राहण्याची ताकत या युवानेतृत्वात आहे.म्हणून कितीही करा हल्ला किरण गायकवाड यांच्या संस्कारांचा कार्याचा मजबूतच राहणार किल्ला…

म्हणूनच…

एक वचन एक निशाण 

KRG हाच आमुचा अभिमान 


समाजाचे ठेवुणी भान 

दिनदुबळ्यांचे करतात कामं 


एक वचन एक निशाण 

KRG हाच आमुचा अभिमान 


संघर्षाचा वारसा जपणं 

सर्वाप्रती आपुलकीच वागणं 


एक वचन एक निशाण 

KRG हाच आमुचा अभिमान 


धाराशिवची आण बाण शाण 

युवकांचे तुम्ही प्रेरणास्थान 


एक वचन एक निशाण 

KRG हाच आमुचा अभिमान 


संकटसमयी येतात धावून 

80%समाजकारण 

20% राजकारण हेच धोरण 


एक वचन एक निशाण 

KRG हाच आमुचा अभिमान…

आपल्याला निरोगी आयुष्य लाभो हिच श्री चरणी प्रार्थना…

– जय महाराष्ट्र ! 

– राम कृष्ण हरी !!

– युवराज शिवाजी गायकवाड!!!

     ( युगा )


#helloomerga @kirangaikwad

Join WhatsApp

Join Now