वाचन संस्कृती जागरण पंधरवाडा अंतर्गत “पुस्तक पालखी” व विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन संपन्न

वाचन संस्कृती जागरण पंधरवड्यातील पहिल्या दिवसाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न 

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने दि. १५ ते ३१ जानेवारी दरम्यान वाचन संस्कृती जागरण पंधरवडा साजरा केला जात आहे. पंधरवड्यातील पहिल्याच दिवशीचे पुस्तक पालखी व विद्यार्थी, शिक्षकांना मार्गदर्शनाचे कार्यक्रम अतिशय उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.

helloomerga


उमरगा शहरात महात्मा बसवेश्वर मंदिर-श्री.महादेव मंदिर-छ. शिवाजी चौक-इंदिरा चौक-आण्णाभाऊ साठे चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-छ. शिवाजी महाविद्यालय-आदर्श महाविद्यालय या मार्गाने पुस्तक पालखी फिरवण्यात आली. पुस्तक पालखीत मा. महादेव पाटील, मा. विश्वनाथ महाजन सर, मा. गिरीधर गोस्वामी सर, मा. नितीन होळे, मा. संजय ढोणे-देशमुख, मा. बाबू स्वामी, मा. प्रविण स्वामी सर, मा. रामकृष्ण सुरेश बिराजदार, मा. विठ्ठलराव जाधव, मा. युसुफ मुल्ला, मा. अमोल पाटील, मा. संजय पवार, ॲड. काशीनाथ राठोड, ॲड. एन. एस. बिराजदार, मा. तानाजी राठोड, मा. कैलास शिंदे, मा. दिलीप गरुड सर, मा. व्यंकट भालेराव, मा. शिरीष कांबळे, मा. शिवानंद दळगडे सर आदींनी पुस्तके दिली. पुस्तक पालखीत  जवळपास १००० पुस्तके जमा झाली. 

helloomerga

दुपारच्या सत्रात उमरगा शहरातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांना वाचनाचे महत्व या विषयावर साहित्यिक डॉ. बालाजी इंगळे सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचनालयाचे मानद सभासदत्व देण्यात आले. कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे शिक्षक मा. परमेश्वर सुतार व मा. श्री. हिप्परगे सर तर जिल्हा परिषद प्रशाला येथील शिक्षक श्री. सतीश कटके सर हे आपल्या विद्यार्थ्यांसह या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंधरवड्यातील पहिल्या दिवसाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, राजू बटगिरे सर, करीम शेख, धानय्या स्वामी, प्रदिप चौधरी, दादासाहेब माने, विजय चितली, ॲड. ख्वाजा शेख व बबिता मदने यांनी श्रम घेतले. 

पंधरवड्यातील पुढील दिवसांत मुळज, होळी, काळ निंबाळा, कदमापूर, कोळसूर-गुं, बेट जवळगा, सालेगाव, आनंदनगर आणि कानेगाव याठिकाणच्या वाचनालयांच्या शाखांमार्फत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे तसेच त्या-त्या गावातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

#helloomerga @shitalchavan

Join WhatsApp

Join Now