प्रा. युसुफ मुल्ला यांना राज्यस्तरीय आय.टी. एक्सलन्स अवार्डने गौरव

उमरगा | प्रतिनिधी

मायक्रोकॉम कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांना संगणक शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथील ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आय.टी. एक्सलन्स महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते रविवारी (ता. १) हिंजवडी, पुणे येथे पार पडलेल्या भव्य समारंभात देण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला उद्योजक तथा संचालक महेश व्यवहारे व कार्तिकेश बोरकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

मायक्रोकॉम कॉम्प्युटर एज्युकेशन ही संस्था गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असून संगणक साक्षरतेसाठी भरीव योगदान देत आहे. या संस्थेमार्फत आतापर्यंत जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यात आले आहे. तसेच अनेक बेरोजगार युवकांना विविध संगणक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मायक्रोकॉम संस्थेला यापूर्वीही विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, प्रा. युसुफ मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.

या पुरस्काराबद्दल आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक विजय दळगडे, प्राचार्य दिलीप गरुड, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक पोफळे, अध्यक्ष धनंजय मेनकुदळे, सचिव राजू जोशी, प्रा. शौकत पटेल यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन नाईक व सुप्रिया नाईक यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मोडवे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.

राज्यस्तरीय पुरस्कारामुळे मायक्रोकॉम संस्थेचे व प्रा. युसुफ मुल्ला यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now