ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या माजी विद्यार्था कडून शाळेस बोर पाडून देण्यात आले.

उमरगा: तालुक्यातील जकेकूर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे 2003- 2004 चे बॅचच्या माजी विद्यार्थानी सामाजिक बांधलकी जोपासत शालेय विद्यार्थ्यासाठी पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपी सोय व्हावी या उद्दात हेतूने आज विद्यालयाच्या प्रांगणात बोर पाडण्यात आले.


ज्या शाळेत आपण शिक्षण घेतलो, ज्या शाळेने आपल्यावर चांगले संस्कार केले व आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणला त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून 2003- 2004 च्या इ. १०वी च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेत असलेल्या गावातील मूलां मुलींसाठी पिण्याचा पाण्याची कायम स्वरूपी सोय व्हावी यासाठी शाळेला बोर पाडून देण्याचा , या बॅचचे सर्व मूलामूलीनी एकत्र येत हा निर्णय घेतला व आज त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.
या साठी चंद्रकात कांबळे, एजाज पठाण, परमेश्वर कोळी, सुरज चौधरी, अनिल कोल्हे, अजिम इनामदार, गोविंद वाघमोडे, व्यंकट दुधभाते, भास्कर सुरवसे, हंसराज वाकळे आदीसह या बॅचच्या सर्व मूला- मूलींनी पुढाकार घेतला.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दत्तात्रय जोशी, बलसूर केंद्रप्रमुख श्री. गोपी पवार आष्टा कासार केंद्रप्रमुख श्री थोरे मुख्याध्यापक श्री. व्ही. टी. घोडके आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now