अपघातग्रस्ताला मदत करून प्रामाणिकपणे परत केला 1 लाख रुपये व मौल्यवान ऐवज

🗓️ दिनांक: 30 सप्टेंबर 2025
📍 स्थळ: उमरगा – लातूर रस्ता

सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि माणुसकीची खरी ओळख याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भगवान सूर्यवंशी, बाबळसुर ता.उमरगा जि. धाराशिव

30 सप्टेंबर रोजी गोटेवाडी, कार्ला आणि तुंगी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेवून . सायंकाळी घरी परतताना, उमरगा – लातूर रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडलेला दिसला. त्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. रस्त्यावर गर्दी होती, पण काही लोक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. मात्र, शिक्षणाने आणि मायबापांच्या संस्कारांनी घडवलेल्या एका सजग व्यक्तीने, एक क्षणही न दवडता तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला.

जखमीला लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे, अपघातग्रस्ताजवळ मौल्यवान वस्तू आणि रोख 1 लाख रुपयांची रक्कम आणि चार किलो चांदी होती. ती सर्व रक्कम आणि वस्तू योग्यरित्या सुरक्षित ठेवल्या आणि नंतर त्याचे सहकारी श्याम माळीमहेश कसबे यांच्याकडे प्रामाणिकपणे परत करण्यात आल्या.

ही कृती केवळ मदतीची नाही, तर एक सामाजिक संदेश देणारी आहे – कर्म जर श्रेष्ठ असेल तर यश आपोआप मिळते.

अशा प्रकारच्या प्रसंगातून खऱ्या अर्थाने माणुसकी काय असते याची जाणीव होते. समाजात असेच जागरूक, सजग आणि प्रामाणिक नागरिक असतील तर आपला समाज नक्कीच सुरक्षित आणि सशक्त होईल.

🙏 सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी आणि अशा परिस्थितीत मदतीचा हात पुढे करावा, हीच अपेक्षा.

Join WhatsApp

Join Now