आज, श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ, उमरगा यांच्या ४१ व्या वर्धापन दिन व आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. दिलीप परशुराम गरुड यांचा सेवा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचे अधिकार पोहोचविण्याचा मार्ग उघडला आहे. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येऊन, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम बनविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक तरुण-तरुणी सक्षम, सशक्त आणि निपुण बनले आहेत.
वर्धापन दिनानिमित्त सर्व संचालक , प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक शुभेच्छा.
तसेच या सोहळ्याला उपस्थित राहून डॉ. गरुड सर यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी मिळाली, याचा विशेष आनंद आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे.
डॉ. गरुड सर यांच्या ज्ञानसंपदा, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेचा आदर्श सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्याने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलले असून, त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले अमूल्य योगदान सामाजिक प्रगतीसाठी मोठा आधार ठरत आहे.
त्यांच्या प्रेरणादायी कार्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
कार्यक्रमाला मा. श्री. विनायकराव पाटील साहेब (अध्यक्ष श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा) , मा. श्री. रामकृष्णपंत खरोसेकर (संस्थेची चिटणीस) मा.श्री. प्राचार्य डॉ. रमेश दापके, मा. श्री. प्राध्यापक शिवराज मोटेगावकर (आरसीसी लातूर संचालक), मा. श्री. वैभव पवार (मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक), मा. श्री. शिवमुर्ती भांडेकर, मा. श्री. विजयकुमार सोनवणे, मा. श्री. शिवराज दिंडीगावे, मा. श्री. बलभीमराव पाटील, मा. श्री. वसंतराव काळे (महाविद्यालय ढोकीचे प्राचार्य) मा.श्री. डॉ. हरिदास फेरे, मा. श्री. जयसिंगराव देशमुख (माजी प्राचार्य), मा. श्री. दिलीप भालेराव , मा.श्री. मल्लिनाथ दंडगे, मा. श्री. केशवराव पवार, मा. श्री. रुक्मागंद पवार, मा. श्री. अनिल उर्फ पप्पू सगर, मा. श्री. डॉ श्रीराम पेठकर (प्राचार्य ) मा. श्री. राम सोलंकर (प्राचार्य), मा. श्री. अशोक सपाटे (प्राचार्य), मा. श्री. सारणे (प्राचार्य), मा. श्री. सरपे (प्राचार्य), मा. श्री. भरडे (उमरगा जनता बँकेचे व्यवस्थापक), मा. श्री. शौकत पटेल (प्राध्यापक), मा.श्री. व्यंकटराव जाधव , मा. श्री. गोविंद सूर्यवंशी, मा. श्री. शिवलिंग माळी, मा. श्री. भोसले (प्राध्यापक), मा. श्री. सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन!