दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा व लोहरा तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेली असून, बांधबंदिस्ती कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे जनावरांचे पूरात वाहून जाणे, अनेक घरांना पडझड होणे तसेच विविध अपघटनात्मक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तातडीने पंचनामा करून शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत व नुकसानभरपाई द्यावी,
प्रशासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व नागरिकांना धीर देत शक्य तितक्या लवकर मदत पोहोचवण्याची ग्वाही दिली आहे.