डिग्गीतील उडीद पिकावर मर रोगाचे संकट, शेतकरी चिंतेत – तत्काळ मदतीची मागणी

मौजे डिग्गी (ता. उमरगा) येथील शेतकरी सध्या उडीद पिकावर आलेल्या मर रोगामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या पिकात फळ धारणा न झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

डिग्गी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा उडीद पिकाची लागवड केली होती. मात्र, अलीकडच्या हवामानातील बदल, बुरशीजन्य संसर्ग व योग्य कीड व्यवस्थापन न झाल्यामुळे मर रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या रोगामुळे उडीद पिके सुकून जात असून, अनेक शेतकऱ्यांनी फळधारणाच न झाल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी सहाय्यक आर. व्ही. पाटील यांनी शेतात जाऊन सदर पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना सुचवल्या.या पाहणीवेळी हॅलो उमरगा पत्रकार युवराज गायकवाड व शेतकरी देखील उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून त्वरित उपाययोजना करून पिकांची संरक्षण व नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक व तांत्रिक मदत करावी, अशी स्थानिक नागरिकांचीही अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now