मराठवाडा शिक्षक संघाच्या उमरगा शहराध्यक्षपदी-श्री गुंजोटे एस. बी.
उमरगा- शिका,संघटित व्हा व संघर्ष करा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार सुशिक्षित लोकांनी संघटीत होऊन आपल्या न्याय मागण्यासाठी संघर्ष केला पाहिजे .तोच शाहू ,फुले ,आंबेडकर यांचा वारसा पुढे घेऊन शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमी झगडणारी एकमेव शिक्षक संघटना म्हणजे मराठवाडा शिक्षक संघ ही आहे.
या मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक व शिक्षक मेळावा दस्तापूर येथील विठ्ठल साई मंदिरात पार पडली. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाच्या उमरगा-लोहारा तालुका कार्यकारणीची फेरनिवड व पुनर्घठन करण्यात आले फेरनिवडीचा प्रस्ताव माजी जिल्हा सचिव पीएस शिंदे यांनी केंद्रीय कार्यकारणी पुढे मांडला व हा ठराव मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला. यावेळी उमरगा शहराध्यक्षपदी कु. माधवी चालुक्य कन्या हायस्कूल उमरगा येथील सामाजिक शास्त्र विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री गुंजोटे एस बी यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना नुतन शहराध्यक्ष श्री गुंजोटे म्हणाले -“भयमुक्त शिक्षक व भ्रष्टाचार मुक्त गुणात्मक शिक्षण द्यायचे असेल तर मराठवाडा शिक्षक संघाचा अधिकृत उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी व प्रश्नांसाठी विधानपरिषदेवर निवडून आणलेच पाहिजे असे आव्हान केले.”
या मेळाव्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार तथा केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, केंद्रीय कार्यकारणी सदस्य फारूक जमादार, जिल्ह्याचे संघाचे अध्यक्ष शेरखाने जे एस, जिल्हा सचिव विक्रम मायाचारी ,अनेक केंद्रीय तथा जिल्हा व तालुका पदाधिकारी, श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी शाळेचे पर्यवेक्षक अजय गायकवाड अनेक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








