डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संलग्नित सर्व जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि संशोधकांसाठी आयोजित आविष्कार स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दोन मॉडेलची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी झाली आहे.
डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आविष्कार स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या दोन संशोधन मॉडेलची निवड करण्यात आली.
कॉमर्स विभागातून वैष्णवी वेंकट गाडे, मेघा नंदकुमार पाटील यांनी सादर केले असलेल्या ‘ग्रामीण विकासाठी माझा गाव मॉडेल’ याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या मॉडेलसाठी डॉ. संजयअस्वले यांचे मार्गदर्शन मिळाले आणि विज्ञान विभागातील प्रतीक्षा यशवंत कांबळे, वैष्णवी विजयकुमार जाणे यांनी मेडिसिन, आणि फार्मसी गटातून सादर केलेल्या ‘मूत्रमार्गातील संसर्ग ओळखण्यासाठी रासायनिक चाचणी या मॉडेलची ही राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली. या मॉडेल साठी विज्ञान विभागाचे प्रा. डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन मिळाले.
या दोन संशोधन मॉडेल विद्यापीठ पातळीवरील संपन्न झालेल्या अविष्कार २०२३ या स्पर्धेत महाविद्यालयाचे १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच प्युअर सायन्स गटात प्रतीक्षा सुरेश कांबळे, मोनिका राजेंद्र निकम यांनी सादर केलेल्या घनकचऱ्यापासून विद्युत निर्मिती या मॉडेलला चौथा क्रमांक मिळाला.
या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून डॉ संजय अस्वले, डॉ. व्ही एस सूर्यवंशी प्रा आर आर नितनवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. जी एच जाधव, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ डी व्ही थोरे, उपप्राचार्य जी बी मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, डॉ केशव लेंगरे, डॉ अजित आष्टे आदींनी कौतुक करून अभिनंदन केले. संशोधनातील या उत्तुंग यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकर हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.








