दुर्गामाता दौड
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची स्थापनाच मुळी देश देव धर्माच्या निस्वार्थी कार्यासाठी आणि आसेतु हिमाचल हिंदवी स्वराज्यासाठी झाली आहे.
आपले प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे असते ती अतिशय दुर्दम्य अशी कारणीमीमांसा.
वर्षभरात आपण जे काही कार्यक्रम करतो त्यामागे आपला फार मोठा उद्देश आणि कारण असते..!
कारणाशिवाय या जगात काही घडत नाही या स्वामी विवेकानंदाच्या वाक्याप्रमाणे आपल्याही प्रत्येक कार्यक्रमान कारण हे उद्दात्त असते.
दुर्गामात दौड का काढावी ?
नेमके काय उद्दिष्ट्य असेल या कार्यक्रमाचे याबाबत लिखित फारसे उपलब्ध नाही,म्हणून हा लेख लिहायला घेतला.
दुर्गामाता दौड म्हणजे नेमके काय ?
प्रतिवर्षी नवरात्र उत्सवात घटस्थापना ते विजयादशमी असे नऊ दिवस भल्या पहाटे उठून ,हातात भगवा झेंडा घेऊन आई जगदंबेचा,देवदेवतांचा ,छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांचा उद्घोष करत गावागावातील प्रमुख ठिकाणी समुहाने दौडत,गीती-पद्ये म्हणत आपण दौड काढतो.
हाती शस्त्र घेतो आणि भवानीचा उदो उदो करतो.
असे नऊ दिवस मोठ्या भक्ती-भावाने आपण दुर्गामाता दौड काढतो..!
महाराष्ट्रातील ३९५ तालुके,३५ जिल्हे गावन गाव..वाड्या वस्त्या तांड्यावर हा उपक्रम सुरु व्हावा यासाठी प्रत्येक धारकर्याने झटले पाहिजे.
दुर्गामाता दौड्च का काढावी ?
३५० वर्षापूर्वी महाराष्ट्रात आणि संपूर्ण हिंदुस्थानात यावनी मुसलमानी आक्रमकांनी बेफान कत्तली,लुटालूट,धर्मांतरण करत आपल्या तलवारींचा नंगानाच सबंध हिंदुस्थानात चालवला होता.
आपली देवळे उध्वस्त होत होती,गाई कापल्या जात होत्या,तारुण्याने मुसमुसलेल्या माता भगिनी पळवल्या जात होत्या.
सबंध महाराष्ट्राचा खाटिक खान झाला होता.
मोगल,कुतुबशहा,निजामशाह,आदिलशहा या मुसलमानी सत्ता आळीपाळीने महाराष्ट्रावर तुटून पडत होत्या.
तरुणांचे तांडेच्या तांडे परमुलखात गुलाम म्हणून विकले जाऊ लागले होते.
जे जातीवंत हिंदू होते त्यांच्या तलवारी लाचारी पत्करून यवनांच्या पदरी गंजत होत्या.
अश्या प्रतिकूल १६ व्या शतकाच्या सुरवातीला अनाथांचे नाथ एकनाथ महाराज जीव तोडून त्या आई जगदंबेला बोलले,तुफान अत्याचार ,कत्तली ,बलात्कार,लुटालूट याने त्रस्त हताश झालेले एकनाथ महाराज त्या भवानीला बोलू लागले…
नमो निर्गुण निराकार | मूळ आदिमाया तूं साकार
घेउनि दहा अवतार | करिसी दुष्टांचा संहार
दार उघड, बया दार उघड
दैत्यकुळी हिरण्यकश्यपु जन्मला | तेणे तुझा भक्त गांजिला
तें न पाहवें तुजला | त्वा उग्ररूप धरिलें
तेव्हा क्रोधें स्तंभ फोडून | नारसिंहरूप धरून
दैत्यासी वधून | प्रल्हाद दिवटा रक्षिला
बया दार उघड | दार उघड
दार उघड, बया दार उघड !
दौडीची सुरवात करताना लक्षात घ्यावयाच्या तांत्रिक बाबी
1) दुर्गामाता दौड़ किती वाजता करावी?
उत्तर :- सुर्योदया पूर्वी दुर्गामाता दौड़ीचा प्रारंभ करावा.साधारणपणे पहाटे 5.30 च्या पुढे व 6.30 च्या अगोदर.
2) दुर्गामाता दौड प्रारंभ कसा करतात ?
उत्तर :-
जिथून दौड़ प्रारंभ कराल तिथे सर्व एकत्रीत जमावे.भगवा ध्वज घेणारा धारकरी भगवा फेटा बांधेल,शस्त्रपथक शस्त्रे हाती धरतील ,ते सुध्दा फेटा बांधतील किंवा पांढरी टोपी घालतील.इतर सर्वही पांढरी टोपी किंवा फेटा बांधतील.बोडक्या डोक्याने एकानेही दौड़ी मध्ये येऊ नये.
सुवासिनी ध्वजधारी धारकर्याची पाद्यपुजा करतील,ध्वजाला हार घालतील,प्रतिष्ठित मान्यवर नारळ वाढवतील त्यानंतर श्रीगणपती व श्रीदुर्गामातेची आरती होईल.
तदनंतर “ध्येय मंत्र” होईल.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय,धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज की जय,भारत माता की जय,हिंदू धर्म की जय हे 4 उद्घोष होतील व दौड़ प्रारंभ होइल.
3) दौडित कोण कोणत्या घोषणा द्याव्यात ?
उत्तर :-
पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज की जय
भारत माता की जय
हिंदू धर्म की जय
हर हर महादेव
अंबा माता दुर्गा माता-एक है,एक है.
दुर्गा माता भारत माता -एक है एक है
भारत माता गंगा माता -एक है एक है.
गंगा माता यमुना माता-एक है एक है
यमुना माता काली माता -एक है एक है.
दुर्गा माता की जय,गोमाता की जय,अंबा माता की जय,माता माता की जय
आई राजा उध उध
तुळजाभवानी..आई दार उघड आई दार उघड
माहुर लक्ष्मी..आई दार उघड आई दार उघड
माता वैष्णो देवी..आई दार उघड आई दार उघड
माता महालक्ष्मी..आई दार उघड आई दार उघड
जोतिबाच्या नावान..चांगभल
खंडोबाच्या नावान..चांगभल
येळकोट येळकोट..जय मल्हार जय मल्हार
4)दौडित कोणती पद्ये गीते म्हणावी ?
उत्तर:-
मराठा म्हणावे अशा वाघराला
जगी हिन्दू अष्टावधानी असावा
देशासाठी जगायच र..शिवबान सांगावा धाड़लाय र
हो जाओ तैयार साथियो
रणी फडकती लाखो झेंडे
शरयू नदीला पुर येता
डोले रे डोले
जय जय महाराष्ट्र माझा
5)दौड़ चालत काढावी की धावत
उत्तर :-
धावत आणि चालत समिश्र काढावी,सतत धावू नए,सतत चालुही नए
6) दुर्गामाता दौड़ कशी समाप्त करावी
उत्तर :-
योजन आधी करून समाप्तिची जागा ठरवा,शक्यतो ते एखादे मंदिर किंवा नवरात्र उत्सव मंडल असावे तिथे देवीची आरती व गणपती आरती म्हणून “प्रेरणा” मन्त्र म्हणावा.
तदनंतर एखाद्याने उद्याचे नियोजन,थोडेसे दौड़ीचे महत्त्व सांगावे,उद्या येताना आणखी 1-2 मित्र आणावे असे आवाहन करावे.
त्यानंतर ध्वज काठीतुन उतरावा,जोवर ध्वज उतरत नाही तोवर कोणीही जागा सोडू नए.
ध्वज उतरून दौड़ संपेल.
7) दौडिच्या शेवटच्या दिवशी काय करावे ?
उत्तर :-
सर्वाना श्रीशिवप्रतिष्ठान व ध्येय समजुन सांगा,पुढील कार्यक्रम म्हणजे मोहिम काय ते सांगा,सर्वांचे संपर्क क्रमांक टिपून ठेवा.शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे काम करण्याचे आवाहन करा.
देशभक्ति,धर्मभक्ति ची प्रार्थना करा.
असेच धर्मासाठी एकत्र यायचे आवाहन करा.
उपस्थित मंडळी चे मनोगत घ्या.
धन्यवाद








