अभाविप उमरगा शहर कार्यकारिणी जाहीर; समर्थ कुंभार यांची शहर मंत्रीपदी निवड

उमरगा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), उमरगा शाखेच्या वतीने ‘छात्रसत्ता विद्यार्थी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले. या संमेलनात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभाविप उमरगा शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमाला लातूर विभाग संयोजक श्री. यश आरिकर यांची प्रमुख उपस्थिती होती. निर्वाचन अधिकारी श्री. गणेश कटके यांनी समर्थ कुंभार यांची उमरगा शहर मंत्री म्हणून घोषणा केली. त्यानंतर नवनिर्वाचित शहर मंत्री समर्थ कुंभार यांनी उर्वरित शहर कार्यकारिणीची घोषणा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संयोजकांनी केले. यावेळी लातूर विभाग संघटन मंत्री श्री. महेश भवर, धाराशिव जिल्हा संयोजक श्री. राजेश कवडे, धाराशिव दक्षिण भाग संयोजक श्री. पंकज बेळकोने, उमरगा तालुका संयोजक श्री. धनेश जाधव तसेच धाराशिव शहर विद्यार्थी विस्तार श्री. पवन नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनिर्वाचित कार्यकारिणी

  • शहर मंत्री: समर्थ कुंभार
  • शहर सहमंत्री: नामदेव शिंदे, ऋतुजा शिंदे
  • शहर कार्यालय मंत्री: शेखर सूर्यवंशी
  • कार्यालय सहमंत्री: स्नेह महामुनी
  • कोष प्रमुख: शुभम कांबळे
  • सोशल मीडिया संयोजक: राजकुमार कांबळे
  • सोशल मीडिया सहसंयोजक: तुकाराम शिंदे
  • स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट संयोजक: हिंदवी भुरे
  • सहसंयोजक: ओंकार सुरवसे
  • स्टुडंट फॉर सेवा संयोजक: प्रणव कुलकर्णी
  • राष्ट्रीय कलामंच संयोजक: प्रतीक्षा राठोड
  • सहसंयोजक: स्वाती शिंदे
  • खेलो भारत संयोजक: व्यंकट जाधव
  • सहसंयोजक: गुंडप्पा माशाळे
  • फार्मा व्हिजन संयोजक: सृष्टी ख्याडे
  • शहर कार्यकारिणी सदस्य: अभिषेक मिसाळ

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासोबतच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now