उमरगा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी अभिमानास्पद कामगिरी उमरगा परिसरातील १४ विद्यार्थ्यांनी केली आहे. चेन्नई, तमिळनाडू येथे World Karate Masters Association (WKMA) यांच्या वतीने आयोजित 3rd WKMA Guinness World Record उपक्रमात सहभागी होत या विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रमाच्या ऐतिहासिक प्रयत्नात आपला ठसा उमटवला.
चेन्नई येथे “Most People Performing Karate Chop Routine Simultaneously” अर्थात एकाच वेळी सर्वाधिक खेळाडूंनी कराटे चॉप रूटीन सादर करण्याचा जागतिक विक्रमाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. देशभरातून मोठ्या संख्येने कराटेपटूंनी यात सहभाग घेतला. उमरगा परिसरातील १४ विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने सहभाग नोंदवत आपल्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवले.
या यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, शिस्त, मेहनत आणि जिद्द यासोबतच पालकांचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वाचे ठरले. ऐतिहासिक उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत त्यांना प्रोत्साहन दिले.
या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुलोचना चौधरी, डॉ. ज्योती सुरवसे, मोहन मुळे, विजयकुमार कुंभार, सुदर्शन काळे, सुबोध कांबळे तसेच पत्रकार लक्ष्मण पवार यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला.
🥋 जागतिक विक्रम उपक्रमात सहभागी १४ विद्यार्थी
- हर्षदा धनराज सूर्यवंशी — WR-02436
- अवनी अतुल जाधव — WR-02437
- तमन्ना आरिफ सय्यद — WR-02438
- स्वर्चंद्रा विशाल सूर्यवंशी — WR-02439
- अनुज विक्रम सूर्यवंशी — WR-02440
- सम्यक विष्णू कांबळे — WR-02441
- अयांश सुबोध कांबळे — WR-02442
- शिवराज मोहन मुळे — WR-02443
- शिवदर्शन त्रिमूर्ती शिंदे — WR-02444
- अयान महमदरफी शेख — WR-02445
- तेजस ज्ञानेश्वर काजळे — WR-02446
- राजनंदिनी — WR-02472
- शर्विल ज्योती सुरवसे — WR-03008
- हर्ष विजयकुमार कुंभार — WR-03191
या संपूर्ण उपक्रमासाठी अमन स्पोर्ट्स क्लब, उमरगाचे संस्थापक अध्यक्ष महंमदरफी शेख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव आणि कठोर मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित उपक्रमात सहभाग घेतला.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला जागतिक व्यासपीठ
या कामगिरीमुळे उमरगा परिसरातील क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
१४ विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालक, शिक्षक, प्रशिक्षक, शाळा, क्रीडाप्रेमी आणि उमरगा परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ग्रामीण मातीतून जागतिक विक्रमाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचलेल्या या १४ विद्यार्थ्यांनी उमरग्याचा क्रीडा ध्वज उंचावला असून, त्यांची ही कामगिरी संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी ठरली आहे.







